
रत्नागिरीतील भूमी अभिलेख कर्मचारी संपात सहभागी नाहीत.
वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील भूमी अभिलेख कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. मात्र रत्नागिरीसह कोकणातील कर्मचारी या संपात सहभागी झाले नाहीत. यामुळे येथील काम सुरळीत आहे. वेतनवाढीसह अनेक मागण्या घेऊन पुणे विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाले. या संपाची व्याप्ती राज्यभर वाढवण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. भूकर मापकांसाठी देण्यात येणारे वेतन अल्प आहे. वेतन तफावत दूर करण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा, अशी कर्मचारी संघटनांची मागणी आहे.www.konkantoday.com