
वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाल्यावर मुंबई ते नवी मुंबई विमानतळ हा प्रवास फक्त 40 मिनिटांत पूर्ण होणार
मुंबईकरांसाठी आता एका खुशखबर आहे. मुंबई आता लवकरत जलमार्गाद्वारे नवी मुंबईशी जोडली जाणार आहे. नवी मुंबई विमानतळाला मुंबईशी जोडण्यासाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली जाईल, असे मत्स्यव्यवसाय आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.आवश्यक ठिकाणी जेट्टी बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ही सेवा सुरू झाल्यावर मुंबई ते नवी मुंबई विमानतळ हा प्रवास फक्त 40 मिनिटांत पूर्ण होईल.
वॉटर टॅक्सी सुरू करण्यासंदर्भात मंत्रालयात एक बैठक झाली. या बैठकीसाठी वाहतूक, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाचे ब्रिजेश सिंघल आणि महाराष्ट्र सागर मंडळाचे प्रदीप बधी यांच्यासह अनेक विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.




