
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एसटीच्या विरंगुळा विश्रामगृहाचे लोकार्पण.
रत्नागिरी, दि.1 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विशेष निधीमधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विरंगुळा विश्रामगृहाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत, महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, एसटीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे आदी उपस्थित होते.