पुण्यातील १०३५२ लाडक्या बहिणींकडे चारचाकी! पडताळणीत अडथळ्यामुळे अद्याप चौकशी अपूर्णच!!

पुणे :* राज्य सरकारने निकषात न बसणाऱ्या पुणे शहर, जिल्ह्यात ७५ हजार लाडक्या बहिणींकडे चारचाकी असल्याचे समोर आले होते. त्या बहिणींकडे गेल्या काही महिन्यांपासून शोध सुरू असून, अद्यापपर्यंत केवळ १० हजार ३५२ बहिणींकडेच चारचाकी असल्याची माहिती पुढे आली आहे. राज्य सरकारने निकषात न बसणाऱ्या पुणे शहर, जिल्ह्यात ७५ हजार लाडक्या बहिणींकडे चारचाकी असल्याचे समोर आले होते.

त्या बहिणींकडे गेल्या काही महिन्यांपासून शोध सुरू असून, अद्यापपर्यंत केवळ १० हजार ३५२ बहिणींकडेच चारचाकी असल्याची माहिती पुढे आली आहे. सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक महिलांकडे ‘चारचाकी’च्या पडताळणीचे आव्हान महिला व बालकल्याण विभागाच्या प्रशासनासमोर आहे.राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींना हप्ता २,१०० मिळणार, की १,५०० याची उत्सुकता होती. सरकारकडे मात्र विकासकामांना द्यायला पैसेच उपलब्ध नव्हते. राज्यातील अडीच कोटी लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपयांची रक्कम देण्याचे सरकारवर मोठे ओझे आहे. त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. पुणे जिल्ह्यात २१ लाख ११ हजार ९९१ महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी २० लाख ८९ हजार ९४६ महिलांना सध्या लाभ मिळत आहे.

निवडणुकीमुळे अर्ज करणाऱ्या प्रत्येक महिलेस लाभ देणे सुरू केले. मात्र, निवडणुकीनंतर निकषांत बसणाऱ्या महिलांनाच लाभ देण्याची घोषणा सरकारने केली. त्यानुसार निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींची नावे कमी करण्यास स्वतः महिला व बालकल्याण विभागाने सुरुवात केली होती. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुमारे पाच लाख महिलांची नावे कमी केली होती.’आधार’ची तपासणी सुरूत्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात चारचाकी असलेल्या बहिणींची यादी सरकारने तयार केली. त्यानुसार, प्रादेशिक परिवहन विभागाने पुणे जिल्हा परिषदेकडे ७५ हजार १०० लाडक्या बहिणींकडे चारचाकी असल्याची यादी पाठविली होती. त्यात पहिल्या यादीत ५८ हजार ३५० आणि दुसऱ्या यादीत १६ हजार ७५० महिलांचा समावेश होता. चारचाकी असलेल्या बहिणींचा शोध घेण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांकडे यादी पाठवली होती. या यादीत सुमारे ५८ हजार बहिणींकडेच चारचाकी असून, उर्वरित १७ हजार महिलांचे आधार कार्डची पडताळणी करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे पुणे जिल्ह्यात ५८ हजार इतक्याच लाडक्या बहिणींकडे चारचाकी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार लाडक्या बहिणींकडे चौकशी करण्यात येऊ लागली, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तालुक्यांमधून गेल्या काही महिन्यांपासून चारचाकीची पडताळणी करण्यात आली. त्या पडताळणीला फार यश आले नसल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. उपलब्ध माहितीवरून, जिल्ह्यातील काही तालुके वगळता उर्वरीत तालुक्यांमधून चारचाकी असलेल्या बहिणींची पडताळणी करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात ११ हजार ९४१ चारचाकी लाभार्थ्यांपैकी ११ हजार ८५३ बहिणींकडे पडताळणी करण्यात आली. त्यात १० हजार ३५२ बहिणींकडे चारचाकी आढळल्याची माहिती समोर आली. अन्य तालुक्यांमधून उर्वरीत यादीनुसार लाभार्थ्यांकडे पडताळणीचे काम सुरू असल्याचे महिला व बालकल्याण विभागाने सांगितले. पुणे शहरातील लाभार्थ्यांच्या पडताळणीची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनीषा बिरारीस यांच्याशी वारंवार संपर्क करूनही तो होऊ शकला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button