
मे महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यातच मुंबई-गोवा महामार्गावरील सवतसडा धबधबा संततधार पावसामुळेे प्रवाहीत
मे महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यातच मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम डोंगरातून प्रवाहीत होणारा सवतसडा धबधबा संततधार पावसामुळेे प्रवाहीत झाला आहे. महामार्गावरून प्रवास करणार्या पावसाळी पर्यटकांना या धबधब्याचे मुख्य आकर्षण असते.अनेक वर्षांच्या कालावधीनंतर या वेळेच्या मान्सूनपूर्व पावसाळ्यात अर्थात मे महिन्याच्या पंधरवड्यानंतर सवतसडा धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे चिपळुणातील पर्यटनाला बहर येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळी पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचा ठरलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम डोंगरातून कोसळणारा निसर्गरम्य परिसरातील विलोभनीय सवतसडा धबधबा यंदाच्या मान्सूनपूर्व पावसातच प्रवाहीत झाला आहे. महामार्गापासून सुमारे अर्धा फर्लांग आतमध्ये असलेला व कोकण निर्माते भगवान परशुराम यांच्या मंदिर परिसरातील डोंगर कड्यावरून प्रवाहीत होणारा हा सवतसडा धबधब्याचे पावसाळ्यात अत्यंत विलोभनीय दृष्य दिसून येते. महामार्गावरील उंच कड्यावरून कोसळणारा धबधबा पाहून पर्यटक़ांची पाऊले आपोआपच धबधब्याकडे वळतात. निसर्गनिर्मित धबधब्याचे हे दृष्य अत्यंत विलोभनीय आहे. या धबधब्याचा आणि कड्यावरून कोसळणार्या प्रवाहाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी महामार्गावरील प्रवासी व कोकणात पावसाळी पर्यटनाला येणारे पर्यटक या धबधब्याकडे आवर्जून वळतात. गेल्या काही वर्षांपासून या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होते