मानवतेसाठी २३ वर्षीय तरूण निघालाय पायी देश भ्रमंतीला

स्वतःसाठी, कुटुंबासाठी फार तर समाजासाठी आपल्या माणसांसाठी भ्रमंती करणे व त्या दरम्यान सर्वांना पुरक होणार्‍या गोष्टी जोडत राहणे ही सर्वसाधारण प्रवृत्ती आहे. मात्र जो व्यक्ती वैयक्तिक स्वार्थ, कुटुंब, समाज, गाव या सर्व मर्यादा ओलांडून केवळ माणुसकी अन मानवतेसाठी खिशात दमडीही न घेता पायी भारत भ्रमंती निघालेल्या २३ वर्षीय अवलियाचे नाव आहे. सर्फराज सिद्दिकी, व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या या अवलियाने आतापर्यंत २१०० कि.मी. अंतर कापले असून रामेश्‍वरपर्यंत पायी प्रवास करत ५ हजार कि.मी. अंतर पार करून भारत भ्रमंती करण्याचा त्याचा निर्धार आहे.प्रत्येकालाच कोणता ना कोणता छंद जडलेला असतो. जीवनातून माणसाला काही ना काही विरंगुळाही हवाच असतो. यात प्रत्येकाच्या विरंगुळ्याचे प्रकार देखील आगळेवेगळे असतात. मनाला सर्वात सुख, समाधान व आनंद हा स्वतः जपलेल्या छंदातूनच मिळत असतो. या छंदाची अव्याहतपणे जोपासना करण्याच्या उदात्त हेतूने सर्फराज सिद्दिकी (रा.देवरिया-उत्तरप्रदेश) हा २३ वर्षीय तरूण चक्क पायीच भारत भ्रमंतीला निघाला आहे.स्वतः काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी संपूर्ण भारतभर पायीच फिरण्याचे ध्येय उराशी बाळगणार्‍या सिद्दिकीने खिशात एक रूपयाही न घेताच घरदार सोडून पायीच भ्रमंतीला निघाला आहे. या भ्रमंतीला निघण्यापूर्वी सुरूवातीला कुटुंबियांकडून विरोधही झला मात्र त्यानंतर कुटुंबियांनी भक्कम पाठिंबा अन आधाराची थाप मारल्याने त्याला खर्‍या अर्थाने प्रोत्साहन मिळाले. भारतभर फिरण्याचा प्रवास पायी कदापीही साध्य होणार नाही, असे टोमणेही कुटुंबियांनी मारले. मात्र स्वतः केलेला संकल्प तडीस नेण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर खिशात एक रूपया न घेता तो भारतभर भ्रमंती करणार आहे. २९ एप्रिल रोजी उत्तरप्रदेश येथून त्याने पायी प्रवासाला प्रारंभ केला. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button