कोकण रेल्वे मार्गावरील ऋषीकेश एक्स्प्रेस गाडीने प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाशाचा लॅपटॉप चोरीला.

कोकण रेल्वे मार्गावरील ऋषीकेश एक्स्प्रेस गाडीने प्रवास करणार्‍या प्रवाशाचा लॅपटॉप चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २४ मे रोजी रात्री १ ते सकाळी ६ दरम्यानच्या काळात घडली. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसात करण्यात आली आहे. त्यानुसार तक्रारदार महिला ही २४ रोजी ऋषीकेश एक्स्प्रेस गाडीने प्रवास करत होती. यावेळी तिची लॅपटॉप असलेली बॅग चोरट्यांनी चोरुन नेली. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button