
बांधकाम कामगारांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन प्रगती केली पाहिजे : महेश म्हाप.
रत्नागिरी महाराष्ट्र शासनाने राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना आणलेल्या आहेत त्यापैकीच या कामगारांना नेहमीच्या कौटुंबिक आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या अशा ग्रुहउपयोगी वस्तूंच्या संचाची भेट शासनातर्फे पात्र लाभार्थ्यांना वाटप केली जात आहे. त्यासोबतच या कामगारांसाठी आरोग्यासाठीच्या व इतर मदतीच्या अशा आवश्यक योजनांचाही लाभ घेतला पाहिजे, असे शिवसेना तालुकाप्रमुख महेश म्हाप यांनी बोलताना सांगितले.पालकमंत्री डॉ. उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या सहकार्याने तालुक्यातील हातखंबा पाली जि.प. गटातील गावांमध्ये बाधकाम कामगारांसाठी योजना माहिती व नोंदणी कॅम्प युवासेना विभाग प्रमुख अॅड. सुयोग कांबळे यांनी विलास बोंबले, पाली युवासेना शाखाप्रमुख विजय राऊत, ॲड.. सागर पाखरे यांच्या मदतीने आयोजित केले.
या करिता तालुका प्रमुख महेश म्हाप यांनी बांधकाम कामगार यांना सहज उपलब्ध न होणारे कंत्राटदार प्रमाणपत्र मिळवून दिले.बांधकाम नोंदणी झाल्यानंतर गृह उपयोगी भांडी संच प्रत्येक जिल्हापरिषद गट प्रमाणे वितरित होण्यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या सुचने प्रमाणे भांडी संच वितरणाचा कार्यक्रम नुकताच हातखंबा व पाली येथे संपन्न झाला. यावेळी जिल्हा सहाय्यक कामगार उपायुक्त आयरे. प्रसिद्ध उद्योजक रवींद्र सामंत. शिवसेना प्रमुख महेश म्हाप, शिवसेना हातखंबा जिल्हा परिषद गट वेभाग प्रमुख सचिन सावंत, युवासेना विभाग प्रमुख ॲड. सुयोग कांबळे, महिला विभागप्रमुख विद्या बोंबले,उपविभागप्रमुख प्रमोद डांगे, हातखंबा सरपंच जितेंद्र तारवे, पाली उपसरपंच संतोष धाडवे, साठरे बांबर सरपंच तृप्ती पेडणेकर, उपसरपंच प्रमोद ठीक, खानू उपसरपंच ज्योती पवार, हातखंबा शाखाप्रमुख संजय भुते, वेळवंड उपसरपंच व्यंकटेश जोशी, विद्या गराटे, विजय राऊत, ॲड. सागर पाखरे, विलास बोंबले, महेश धाडवे उपस्थित होते.यावेळी बोलताना महेश म्हाप म्हणाले की, नोंदणीकृत कामगारांसाठी ही योजना फक्त भांड्यांसाठी नसून त्या रांच्या सुख-दुःखात उपयुक्त ठरणाऱ्या आहेत.
यासाठी तर नोंदणी करावी.नोंदणी केलेल्या कामगारांच्या पाल्यांसाठी पहिली ते सातवीपर्यंत शैक्षणिक मदत म्हणून अडीच हजारांची मदत मिळते. मूल जन्मास आल्यानंतर, अपघाती मृत्यू पावल्यास मदत कामगारांना दिली जाते. शासनाचे या कामगार कल्याणसाठीच्या महत्त्वकांक्षी योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांसाठी नोंदणी होऊन त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी हातखंबा पाली जिल्हा परिषद गटातील सर्व गावात ॲड. सुयोग कांबळे, विजय राऊत, ॲड. सागर पाखरे, विलास बोंबले विशेष मेहनत घेतल्याबद्दल त्यांचा शिवसेना तालुकाप्रमुख महेश म्हाप यांनी कौतुक करून सत्कार केला. तसेच यांना प्रत्येक गावातून बांधकाम र नोंदणी करिता सहकार्य केलेल्याचे कौतुक केले.