
चिपळूणच्या हायटेक बस स्थानकाच्या पिलर्सचे तब्बल ६ वर्षानी चिपळूणकरांना दर्शन*
*__हायटेक धर्तीवर बांधण्यात येत असलेल्या चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचा पाया रडतखडत का होईना पण पूर्णत्वास गेला असून तब्बल ६ वर्षानंतर प्रत्यक्ष कामाच्या पिलरचे दर्शन होत आहे. सदर कामाचा ठेकेदार बदलल्यानंतर सद्यस्थितीत पिलर उभारणीच्या कामाला काहीशी गती आली असली तरी बसस्थानकाची इमारत पूर्ण होण्यास आणखी किती वर्षे लागणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.प्रवासी वाहतुकीचे मुख्य केंद्र असलेल्या येथील मध्यवर्ती बसस्थानकाची जीर्ण इमारत तोडून त्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधांनी युक्त हायटेक अत्याधुनिक बसस्थानक उभारणयास खर्या अर्थाने २०१८ मध्ये प्रारंभ झाला. त्याचे भूमिपूजन तत्कालीन पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. www.konkantoday.com