
वाशिष्ठी नदीत तरुण बुडाला.
चिपळूण तालुक्यातील गोवळकोट भोईवाडी येथील वाशिष्ठी नदी पात्रात तरुण बुडाल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजता घडली. अनंत अशोक निवाते (३५) असे या तरुणाचे नाव आहे. अनंत निवाते होडीमध्ये बसलेला दिसला. त्यानंतर तो होडीमध्ये नव्हता. त्याच्याजवळ संपर्क देखिल होत नसल्याने शोधाशोध करण्यात आली. यानंतर नदीपत्रात सायंकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. हा तरुण मूळचा राजापूर तालुक्यातील ओणी या गावचा असून सध्या तो त्याच्या आजोळी म्हणजे गोवळकोट येथे राहात होता. त्याला अधून-मधून चक्कर येत असल्याचे समजते. त्यातूनच तो नदीपात्रात पडला असावा, असे सांगण्यात येत आहे. रात्री उशिराने चिपळूण पोलीस स्थानकात या प्रकरणी घटना नोंद करण्याचे काम सुरु होते.www.konkantoday.com