
लांजातील वीज समस्यांबाबत ’उबाठा’ची महावितरणवर धडक .
लांजा शहरासाठी कायमस्वरूपी वायरमन मिळावा, या प्रमुख मागणीसह अन्य वीज समस्यांसंदर्भात मंगळवारी ठाकरे शिवसेनेने उपजिल्हा संघटक उल्का विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली लांजा येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे लांजा शहरासह तालुक्यातील जनता त्रस्त आहे. पावसाळ्यापूर्वीच दिवसातून अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होणे, शहरासाठी स्वतंत्र वायरमन नसणे याचप्रमाणे लांजा शहराची लोकसंख्या व इतर ग्रामीण भाग यांचेसाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करणे, आदी विविध प्रश्न आहेत. यामुळे लांजा शहरासह तालुक्यातील जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेना पदाधिकार्यांनी महावितरणच्या अधिकार्यांना जाब विचारला. महावितरणच्या या कारभारामुळे जनता त्रस्त आहे. शहरासह तालुक्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या घटना घडत आहेत.www.konkantoday.com