नियम धाब्यावर बसवून रत्नागिरीत एसटी बसमधून आंब्याच्या पेट्यांची वाहतूक.

रत्नागिरीत प्रवासी एसटी बसमध्ये चालकाच्या बाजूच्या जागेतून आंब्याच्या पेट्यांची वाहतूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एसटीची मालवाहतुकीसाठी सामानाची जागा असताना अशा प्रकारे एसटी चालकाच्या बाजूच्या जागेतून आंबा पेट्यांची वाहतूक होत असल्याने प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकाराचा प्रवाशाने फोटो काढून समाजमाध्यमांवर टाकल्याने हा प्रकार उघडकीस आला.एसटी प्रवासी वाहतुकीसाठी असताना चालकाच्या बाजूला असलेल्या जागेतून आंबा पेट्या ठेवून पोहोचविण्याचे काम करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली. एसटीच्या लगेज बॉक्समधून पेटी व पार्सल नेता येते मात्र बसमधून अशा प्रकारची वाहतूक करण्यास परवानगी नाही. संबंधित विभागाला झालेला प्रकार सांगण्यात आला आहे. बसमध्ये पेटी अथवा पार्सल घेवू नये अशा सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button