
दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले काढण्यासाठी आमदार किरण सामंत यांच्याकडून मदत कक्षाची उभारणी
*मतदार संघातील विद्यार्थ्यांना कोणती अडचण आल्यास थेट संपर्क साधा आमदार किरण सामंत यांनी केले आवाहन
नुकतेच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपन्न झाली पुढील शैक्षणिक कामासाठी त्यांना लागणारे उत्पन्नाचा, जातीचा दाखला ,नॉन क्रिमिलियरचा दाखला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा अधिवास दाखला या विविध दाखल्यांची आवश्यकता असून विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही तसेच त्यांना वेळेत पुढील प्रवेश न मिळाल्याने शैक्षणिक नुकसानाला सामोरे जावे लागते. याचा विचार करता लांजा- राजापूर – साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यांसाठी मदत कक्ष सुरू केला असून लांजा तालुक्यातील संपर्क कार्यालय येथे लांजा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी लागणारे शैक्षणिक दाखल्यांचे अर्ज मोफत तसेच त्यांना लागणारे सर्वतोपरी मदत त्या ठिकाणी केली जाईल. त्यासाठी सर्वेश तेंडुलकर +919309988556 यांच्याशी तसेच राजापूर तालुक्यातील संपर्क कार्यालय मधून राजापूर विभागातील येणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत मार्गदर्शन करून त्यांना दाखला उपलब्ध करून देईपर्यंत मदत केली जाणार आहे. त्यासाठी प्रसन्न मालपेकर +91 94056 91533 यांच्याशी संपर्क करावा.
*आमदार किरण सामंत यांच्या संकल्पनेतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून लांजा- राजापूर- साखरपा विधानसभा मतदारसंघांमध्ये राबवला जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी अगदी 100 एक किलोमीटर हुन राजापूर तसेच लांजा या तालुक्यामध्ये येत असतात त्यांना येण्या जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. मात्र काही अडचणीमुळे त्यांचे कामे सुद्धा वेळेवर होत नाही तसेच त्यांना दाखले सुद्धा वेळेवर मिळत नाही. यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही या उद्देशाने विद्यार्थ्यांना सहकार्य करावे असे थेट आदेशच आमदार किरण सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत ते तेवढ्यावरच न थांबता विद्यार्थ्यांना कोणताही दाखला न मिळाल्यास माझ्याशी थेट संपर्क साधा असे आव्हान त्यांनी केले आहे. त्यामुळे लांजा राजापूर साखरपा विधानसभेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखला काढण्यासाठी कोणतीही अडचण आल्यास थेट आमदार किरण सामंत यांच्या संपर्क कार्यालयामध्ये संपर्क साधण्याचे आवाहन आमदार किरण सामंत यांनी केले आहे.