एस.टी. प्रशासनाकडून चव्हाण कुटुंबियांना लवकरच मदत मिळणार
रत्नागिरी: कुवारबांव येथील रहिवासी व एस.टी.चे कर्मचारी परशुराम चव्हाण यांनी चार दिवसांपूर्वी कुवारबांव येथे विहिरीत उडी घेतली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. चव्हाण यांनी एस.टी. प्रशासनाविरूद्ध औद्योगिक न्यायालयात अर्ज केला होता. चव्हाण यांचे फंड व अन्य पैशाबाबत एस.टी. प्रशासनाविरूद्ध चव्हाण हे लढा देत होते. त्यानंतर चव्हाण यांनी सुरूवातीला वैद्यकीय रजा घेतली. त्यामुळे प्रशासनाकडून चौकशीचे काम थांबले होते. चव्हाण यांचा मृत्यूचा दाखला जमा होताच त्यांच्या कुटुंबियांना फंड, ग्रॅज्युईटी लवकरच एस.टी.कडून देण्यात येणार असल्याचे कळते.
www.konkantoday.com