
चिपळूण तालुक्यातील तांबी धरणात गुरे चारण्यास गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू.
चिपळूण तालुक्यातील मालघर लोहारवाडी येथील तांबी धरणात गुरे धुण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. दिवसभर त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, चिपळूण नगर परिषदेच्या बोटीद्वारे व स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल सात तासांनी त्याचा मृतदेह सापडला.
या घटनेमुळे मालघर गाव हादरला असून लटके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.प्रतीक अजय लटके (३०, मालघर टेपवाडी) असे धरणात बुडून मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. प्रतिक हा दररोज गुरे धुण्यासाठी तांबी धरणात जातो. रविवारी देखील नेहमीप्रमाणे तो गेला होता. यावेळी त्याच्यासोबत अन्य दोन ते तीन लहान मुले होती.www.konkantoday.com