
पावस-पूर्णगड मार्गावर कारला धडक देणार्या दुचाकीस्वारावर गुन्हा.
रत्नागिरी तालुक्यातील पावस-पूर्णगड रस्त्यावरील कुर्धे येथे कारला धडक देणार्या दुचाकी चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी अपघाताची घटना घडली होती. सनाउलाह इशराक भाटकर (१९, रा. राजापूर) असे दुचाकी चालकाचे नाव आहे. त्याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सनाउलाह हा ८ नोव्हेंबर २०२४ रोजी दुचाकी (एमएच ०८ बीएफ ४४७८) येथून पावस पूर्णगड रस्त्याने जात होता. सायंकाळी ४ च्या सुमारास तो कुर्धे जितेंद्रनगर येथे आले असता कारला त्याची धडक बसली. यात सनाउलाह व त्यांच्यासोबत असलेल्या अन्य एकाला दुखापत झाली, अशी नोंद पूर्णगड पोलिसांत करण्यात आली आहे. www.konkantoday.com