
किरण सामंत यांच्या हस्ते राजापूर तालुका प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
राजापुरात महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत किरण सामंतांनी फोडला प्रचाराचा नारळ
*राजापूर* विधानसभेची रंगत सुरू असताना महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सामंत यांनी राजापूर तालुक्याच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन किरण सामंत तसेच महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. महायुतीचे उमेदवार म्हणून किरण सामंत यांना उमेदवारी मिळाल्यानंतर महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी किरण सामंत यांना निवडून आणण्यासाठी जोर लावला आहे. त्यातच प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना विविध ठिकाणातून किरण सामंत यांना पाठिंबा मिळत आहे.
आज राजापूर तालुक्याच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत किरण सामंत यांनी नारळ फोडून केला. किरण सामंत सारखा नेतृत्व आज राजापूर लांजा तालुक्यासाठी आवश्यक असून त्यांना आमदार करून या विभागाच्या विकासाला कायापालट करायचा आहे असे मत येथील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. बायोतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी किरण सामंत यांना उमेदवारी देण्याचा कारण होतं आणि किरण सामंत यांच्यासारखा उमेदवार आम्हाला मिळाला हे राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे भाग्य असल्याचे यावेली सांगितले रात्रीचा दिवस करू आणि किरण सामंत यांना आमदार करण्यासाठी अहो रात्री प्रयत्न करणार असल्याची शपथ यावेळेस कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी आरपीआय आणि घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.