
गेल्या चार महिन्यांत पावसामुळे 29 कोटींचे नुकसान.
पावसाचा चार महिन्यांचा हंगाम आटपला असून, यंदा पावसाने समाधानकारक सातत्य ठेवत जिल्ह्यात 4 हजार 200 मि.मी. ची विक्रमी सरासरी गाठली. सरासरीच्या 24 टक्के पाऊस अतिरिक्त झाला आहे.यामुळे पाणी टंचाईची झळ कमी बसणार असली, तरी गेल्या चार महिन्यांत पावसामुळे 29 कोटींचे नुकसान झाले आहे.यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाचवेळा पूरस्थिती निर्माण झाली होती. या कालावधीत सुमारे साडेतीनशे लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरीत करावे लागले होते. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनीही अनेकदा इशारा पातळी ओलांडल्याने आसपासच्या गावांवर पुराची टांगती तलवार होती.