जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रत्नागिरी शहराच्या पाणी टंचाई चा अाढावा घेउन दिल्या अधिकाऱ्यांना सूचना

रत्नागिरी: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रत्नागिरी शहराच्या पाणी टंचाई चा घेतला आढावा. दिनांक 12 मे 2019, रविवार रोजी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री सुनील चव्हाण यांनी रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठा विषयी आढावा घेण्याकरिता शहराच्या पाणीपुरवठा स्त्रोत शीळ धरण, पानवल धरण व साळवी स्टॉप येथील फिल्टर प्लांट येथे भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत श्री अरविंद माळी मुख्याधिकारी रत्नागिरी नगरपरिषद, श्री सोहनी उप अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, श्री नलावडे अभियंता जलसंपदा विभाग हे उपस्थित होते.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील उपलब्ध पाणीसाठा किमान साठ दिवस पुरेल अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता नी यांनी या भेटीच्या वेळी दिली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी शीळ धरण येथील पंपिंग स्टेशनला व साळवी स्टॉप येथील फिल्टर हाऊस येथे भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली व मुख्याधिकारी यांचेकडून शहरातील साठवण टाक्या वितरण व्यवस्था यांचा आढावा घेतला.
पानवल धरणातील पाण्याची क्षमता वाढण्याकरता पानवल धरणातील गाळ लोकसहभागातून काढण्याचे आव्हान त्यांनी नगरपरिषदेस केले. नगरपरिषदेची नवीन पाणी योजना लवकरात लवकर अंमलबजावणी करून कार्यान्वित करावी, तसेच योजनेच्या कोणत्याही अडचणी आल्यास सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन मा जिल्हाधिकारी यांनी दिले.तसेच मुख्याधिकारी यांना शहरातील पाणी समस्या च्या अनुषंगाने सध्याच्या वितरण व्यवस्थेतील त्रुटी निवारण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रत्नागिरी शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे सुनील चव्हाण यांनी आव्हानही केले.

Related Articles

Back to top button