
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले आसाराम बापू उपचारासाठी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामधील कलोत येथील माधवबाग वैद्यकीय केंद्रात
. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले आसाराम बापू यांना उपचारासाठी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामधील कलोत येथील माधवबाग वैद्यकीय केंद्रात आणण्यात आले आहे. तेथे तेआयुर्वेदीक उपचार घेत आहेत.जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूना माधवबाग वैद्यकीय केंद्रात हृदयविकाराच्या उपचारासाठी आणण्यात आले आहे.अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. आसाराम बापू यांना सप्टेंबर २०१३ मध्ये अटक करण्यात आली होती. जोधपूर मध्यवर्ती कारागृहात ते शिक्षा भोगत आहेत. आरोग्याच्या कारणासाठी त्यांना राजस्थान उच्च न्यायालयाने ७ दिवसांची पॅरोलवरची रजा मंजूर केली आहे. यानुसार त्यांना खालापूर तालुक्यातील कलोते येथील माधवबाग आयुर्वेदिक येथे आणण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.गेल्या काही दिवसांपासून आसाराम यांना ह्रदयविकाराचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी स्थानिक परिसरात ठेवल्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली होती. त्यानंतर कोर्टाने खालापूर येथील माधवबागमध्ये उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. पॅरोल मंजूर करताना हायकोर्टाने काही अटी घातल्या आहेत.त्यानुसार त्यांच्यासोबत चार पोलीस कर्मचारी प्रवास करतील, सोबत दोन अटेंडंट ठेवण्याची मुभाही देण्यात आली होती. खोपोलीतील एका खाजगी कॉटेजमध्ये ठेवण्यात येणार असून उपचार व वाहतुकीचा संपूर्ण खर्च तसेच पोलीस बंदोबस्ताचा खर्च आसाराम यांना करावा लागणार आहे.




