देवरूखात सोन्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न

आंगवलीपाठोपाठ चोरट्यांनी आपला मोर्चा आता देवरूख शहराकडे वळवला आहे. शनिवारी रात्री येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सोन्याचे दुकान फोडण्याचे प्रयत्न झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. भरवस्तीतील या दुर्घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.मुरादपूर येथील आत्माराम बांडागळे यांचे आनंदम हे सोन्याचे दुकान आहे. गेली पाच वर्षे ते व्यवसाय करत आहेत. बांडागळे हे शनिवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले. रविवारी सकाळी बांडागळे दुकान उघडण्यासाठी आले असता शटर दोन्ही बाजूने उचकटलेले दिसले. चोरीच्या उद्देशाने हे शटर उचकटण्यात आल्याचे बांडागळे यांच्या निदर्शनास आले. आतील लोखंडी दरवाजामुळे चोरट्यांना चोरी करण्यात अपयश आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button