
आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्यांवर सायबर पोलिसांची २४ तास करडी नजर
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांवर कुणी आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा रत्नागिरी पोलिसांकडून देण्यात आला आहे. समाज माध्यमांवर आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ, मजकूर व अफवा पसरविल्यास तातडीने कारवाई करण्यात येईल. पोलिसांच्या सायबर सेल अशा गोष्टींवर २४ तास नजर ठेवून असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून होत असतो. विशाळगड येथील घटनेनंतर पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सावधगिरी बाळगली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉटसअप, युट्युब आदी समाज माध्यमांवर कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.www.konkantoday.com