
दुपारी 3 वाजता सर्वच 274 आमदारांचे मतदान पूर्ण
विधानपरिषदेसाठी विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी, सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानपरिषदेसाठी एकूण 274 आमदारांचं मतदान होणार असून दुपारी 3 वाजता सर्वच 274 आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे सध्या तुरुंगात असलेल्या आमदार गणपत गायकवाड यांना मतदानाचा हक्क बजावता येणार की नाही, याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर निवडणूक आयोगानेही त्यांना मतदान करण्याची परवानगी दिल्यानंतर त्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सर्वात शेवटी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आता काही वेळातच निकालाची प्रतीक्षा आहे