
रत्नागिरी शहरातील रस्ते खड्डेमुक्त करावेत; श्री राम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी शहर आणि परिसरातील रस्त्यावर पावसाळ्याच्या प्रारंभीच मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. हे खड्डे संबंधित यंत्रणांनी तात्काळ बुजवून रस्ते खड्डेमुक्त करावेत, अशा आशयाचे निवेदन रत्नागिरी येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह आणि नगरपरिषद उपमुख्य अधिकारी श्री. माने यांना देण्यात आले.श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या दिनांक 13 जुलै रोजी होणाऱ्या मासिक मेळाव्यात या विषयावर गंभीर चर्चा करण्यात येणार आहे शहरातील रस्ते खड्डे मुक्त करण्यात आले नाहीत तर दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता रत्नागिरी नगर परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे संयोजक श्री. सुरेश लिमये, सचिव श्री. सुरेंद्र घुडे, खजिनदार श्री. सुरेंद्र शेटे, निवृत्त डेपो मॅनेजर श्री. दिलीपराव साळवी, नंदकुमार आठवले, रमाकांत माळवदे तसेच महिला प्रतिनिधी श्रीमती स्नेहल कुंभवडेकर आणि श्रीमती अपर्णा कोचरेकर यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.