
रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे घराला भीषण आग
रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे आज सायंकाळनंतर एका घराला भीषण आग लागली. त्यामुळे राजवाडा परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती रत्नागिरी नगर परिषदेला कळताच तत्काळ अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले
या संदर्भात हाती आलेल्या वृत्तानुसार येथील काद्री यांच्या घराला आग लागल्याचे समजते. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र शॉर्ट सर्किटने आग लागण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे.




