
रत्नागिरीनजीक निवळी येथे रिक्षा तसेच ट्रकचा भीषण अपघात रिक्षामधील चालकासह चार मुली जखमी
मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीनजीक निवळी येथे रिक्षा तसेच ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातात रिक्षामधील चालकासह चार मुली जखमी झाल्या आहेत. यात गंभीररित्या जखमी झालेल्या एका चार वर्षीय बालिकेवर रत्नागिरी येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ कोल्हापूरला हलवण्यात आले आहे. अपघातानंतर जखमीना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.सोमवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास रिक्षा तसेच ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात रिक्षाची दुरवस्था झाली असून ट्रक घटनास्थळी कलंडला आहे. अपघातातील ट्रक हा मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघाला होता. या अपघातात रिक्षामधील चार मुली जखमी झाल्याचे समजते. अपघातात जखमी झालेल्याना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले www.konkantoday.com