मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे एसटी आणि कार अपघात

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गवरील संगमेश्वर एसटी स्टॅन्ड पासून काही अंतरावर असलेल्या निढले वाडी येथील चिपळूणहून रत्नागिरीकडे एसटी बस चालक विकास कांबळे हे एसटी बस क्रमांक MH09FL1081 घेऊन जात असताना गोवा येथून मुंबई च्या दिशेने MH47BPO556 मारोती फॉरनेक्स गाडी ही चालक हे अमित चावला हे त्यांची पत्नी आशा चावला यांच्यासह जात असताना दुपारी अडीच च्या सुमारास अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यातील कोणीही जखमी झाले नसून दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अपघातामुळे मुबंई च्या दिशेने तसेच गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही बाजूकडे मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा लागून वाहतूक खोलंबली होती. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक शंकर नागरगोजे, पोलीस हेड कॉन्सटेबल शेलार, पॉलीस कॉस्टेबल विश्वास बारगाले यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button