मराठी व उर्दु शाळांतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार

शासनाच्या माध्यमातून दरवर्षी मराठी व उर्दु शाळांतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. शाळेचे सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी या पाठ्यपुस्तकाचे वितरण होते. त्यासाठी जि.प.चा शिक्षण विभागाकडे जिल्ह्यातील १ लाख ४ हजार १५६ मुलांसाठी ३ लाख ७८ हजार पुस्तके प्राप्त झाली असून त्यांचे तालुकास्तरावर शाळांना वितरण सुरू झाले आहे.रत्नागिरी जि.प. शिक्षण विभागामार्फत मोफत पाठ्यपुस्तकांची मागणी यापूर्वीच नोंदवण्यात आली आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत १ लाख ४ हजार १५६ विद्यार्थ्यांसाठी १ लाख ७ हजार ८४ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. ही मागणी केलेली सर्व पुस्तक संच जिल्ह्यासाठी प्राप्त झाली आहेत. १५ जूनला नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे. या नववर्षात जिल्ह्यात इ. १ लीत १० हजार ५७१ मुले प्रवेश करणार आहेत. त्यात ५३५६ मुलगे व ५२१५ मुलींचा समावेश आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button