
आरामबसमधून मुंबईकडे जाणार्या प्रवाशाचा हृदयविकाराने मृत्यू
नाणीज ः सिंधुदुर्गातून मुंबईकडे आराम बसमधून प्रवास करणार्या प्रौढाचा निवळी येथे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सीताराम संभाजी बोडेकर (४९, रा. मुलुंड, मुंबई) हे आठ दिवसांपूर्वी आपल्या सिंधुदुर्गातील वैभववाडी शिराळा येथील मूळ गावी आले होते. रविवारी सायंकाळी एका आरामबसने ते मुंबईडे जाण्यासाठी निघाले होते.
आराम बस रात्रौ १० च्या सुमारास पालीजवळ आली असता त्यांना अस्वस्थ वाटू लागले. हातखंब्यापासून जवळच असलेल्या निवळी येथील एका हॉटेलजवळ आराम बस थांबली यावेळी सीताराम बोडेकर यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले.