
चिपळूण नगरपरिषदेची जोरदार कारवाई, शहरातील साठहून अधिक बॅनर जप्त
मुदत संपलेले आणि अनधिकृतरित्या झळकणारे साठहून अधिक बॅनर व फलक शहरातून जप्त करण्यात आले आहेत. चिपळूण नगगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. विशेष म्हणजे मतदान जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले फलक देखील प्रशासनाने हटविले आहेत.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी चिपळूण नगर पालिकेचे मुख्याधिकाारी विशाल भोसले यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. आचारसंहिता लागू झाल्याच्या दिवशी त्यांच्या सुचनेनुसार शहरातील सर्वच भागातील लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी यांच्यासह सर्वच प्रकारचे बॅनर व फलक जप्त करण्यात आले होते. www.konkantoday.com