महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान केलं जात असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आराेप

१ जूनपासून राज्यात कोरोना लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जाणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. जनतेला लॉकडाऊन उठल्यानंतरची नियमावली समजावून सांगतांना मुख्यमंत्र्यांनी भाजपवरही निशाणा साधला. महाराष्ट्राचं सरकार कोणीही पाडू शकत नाही. राज्यातलं सरकार पूर्णपणे स्थिक आहे. जनता सोबत आहे त्यामुळे सरकार पडणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान केलं जात असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. मुंबई महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, राष्ट्रपती राजवट लावा आणि लष्कराला बोलवा असं म्हणलं जातंय, पण त्यांना आकडेवारी दाखवा.६५ हजारातले २८ हजार रुग्ण घरी गेले आहेत. तसंच बहुतेक जणांचा कोरोना मध्यम स्वरुपाचा आहे. तर व्हॅन्टिलेटरवर असेलेले काही रुग्णही बरे झाले आहेत. महाराष्ट्राला आपलीच काही लोकं बदनाम करत आहेत, त्यामुळे दु:ख होतं. महाराष्ट्रात भयावह स्थिती नाही. दुर्दैवानं आपलीच लोकं कारस्थान करतात, असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपलाा लगावला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button