
एकनाथ शिंदेआणि त्यांच्या टोळीने ४ जूननंतर तुरुंगात जायची तयारी ठेवावी’,-खासदार संजय राऊत
ज्या गुन्ह्यामुळे एकनाथ शिंदे ईडीला घाबरून पळून गेले, त्याच प्रकरणात ते तुरुंगात जातील. मोदी, शाह, फडणवीस वाचवायला येणार नाहीत. त्यांनी आणि त्यांच्या टोळीने ४ जूननंतर तुरुंगात जायची तयारी ठेवावी’, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना दिला.एकनाथ शिंदे यांनी खिचडी घोटाळ्यावरून केलेल्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, “चार जूनपर्यंत तुम्हाला जे काही तांडव करायचं, ते करा. मग तुमचे जे काय घोटाळे आहेत, ते बाहेर काढू. बाहेर निघतच आहेत. एकनाथ शिंदेंनी भ्रष्टाचारावर बोलावं, हे फार मोठं आश्चर्य आहे. स्वतः केलेल्या भ्रष्टाचाराला घाबरून ज्या माणसाने पलायन केले. स्वतःचे घोटाळे बाहेर पडताहेत आणि मला अटक होईल, या भीतीने ज्याची गाळण उडाली. पाय लटपटू लागले. डोळ्यातून अश्रू काढले, असा माणूस भ्रष्टाचारावर बोलतो. ही महाराष्ट्रातील फार मोठी गंमत आहे.”नाशिकचे सुधारकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईवर राऊत म्हणाले की, “ऐन निवडणुकी आमचा प्रमुख नेता, आमचा जिल्हाप्रमुख हा जो प्रचारात आघाडीवर आहे. ज्याच्या हातात निवडणुकीची सूत्रे आहेत. त्यांना तुम्ही तडीपारीची नोटीस काढता.त्याला तुम्ही काय म्हणणार? सगळे गुंड, तडीपार तुरुंगातून सोडून तुम्ही (एकनाथ शिंदे) आपल्यासोबत घेतले आहेत, याला तुम्ही काय म्हणणार?”राजकीय कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकून तुम्ही तडीपाऱ्या करत आहात. चार जूननंतर उत्तर दिले जाईल. या राज्याचा मुख्यमंत्री तडीपार होईल, असे त्यांचे गुन्हे आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांची टोळी यांचे एवढे अपराध आहेत की, या एकनाथ शिंदेंना तडीपारीची नोटीस बजावली जाईल. एकतर ते तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील. लिहून ठेवा. मी हे नगरमध्ये सांगतोय”, असा इशारा राऊत यांनी दिला.www.konkantoday.com