राजापूर प्रांत कार्यालयातील मीटर रूमला आग, कोणतेही नुकसान नाही

राजापूर नगरपरिषदेच्या छत्रपती  शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या इमारतीत असलेल्या मीटर रूममध्ये शॉर्ट सर्किट होवून आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. मात्र या घटनेत कोणतेही नुकसान झालेले नाही.सोमवारी सायंकाळी प्रांत कार्यालयाच्या खाली असलेल्या मीटर रूममधून अचानक धूर येवू लागल्याने प्रांत कार्यालयातील कर्मचार्‍यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ राजापूर नगरपरिषदेच्या अग्नीशामक बंबाला पाचारण केले. अग्नीशामक बंब देखील काही वेळातच घटनास्थळी पोहोचला व आग विझविण्यात यश आले. मीटर रूममध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button