कोकणातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोकणचा हापूस मोठ्या प्रमाणावर वाशी बाजारपेठेत

कोकणातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोकणचा हापूस मोठ्या प्रमाणावर वाशी बाजारपेठेत दाखल झालागुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोकणचा हापूस बाजारात पाठविण्याची परंपरा यंदाही अनेक बागायतदारांनी जपली आहे. त्यामुळे सलग दोन दिवस वाशी बाजारात हापूसच्या ६७ हजार आणि ५५ हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पेट्या आल्याचे वाशीतील व्यावसायिकांनी सांगितले. हापूसचा दर ३०० ते ८०० रुपये डझन विकला जात असून तुलनेत पाचशे रुपयांनी कमी आहे. मात्र मागील आठवड्यातील घसरण काहीअंशी थांबल्यामुळे बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातून गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला हापूस बाजारात विक्रीसाठी पाठविण्याची परंपरा आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने हंगाम सुरू होतो. परंतु यंदा फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून तुलनेत सर्वाधिक हापूस वाशीसह पुणे, अहमदाबाद, पश्‍चिम महाराष्ट्रातील विविध बाजारात दाखल झाला. लवकर आणि मुबलक आंबा विक्रीसाठी आला होता. ५० टक्केहून अधिक बागायतदारांनी पाडव्याला विक्रीचा मुहूर्त केला आहे. www.konkantoday.vom

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button