
*संगमेश्वर तालुक्यात१९० पैकी २७ पाणी नमुने दुषित*
_____रत्नागिरी जिल्हा प्रयोगशाळेडून पाणी नमुने तपासणीचा अहवाल नुकताच संगमेश्वर पंचायत समिती आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. १९० पैकी २७ पाणी नमुने दुषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दुषित पाणी नमुन्यांमध्ये संगमेश्वर तालुका अव्वल झाला आहे.पाणी हे जीवन आहे. दुषित पाण्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळते. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रयोगशाळेकडून सार्वजनिक विहिर, नळपाणी योजना, बोअरवेल आदी ठिकाणचे पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात येतात. जानेवारी महिन्यात संगमेश्वर तालुक्यात ११ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून १९० पाणी नुमने तपासणीसाठी घेवून वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आले होते. याचा अहवाल संगमेश्वर पंचायत समिती आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहे.www.konkantoday.com