
आयटीआय लांजा येथे तासिका तत्वावर पदभरती १८ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत
रत्नागिरी, दि.17 – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लांजा येथे तारतंत्री (वायरमन) या व्यवसायासाठी शिल्प निदेशक, गणित व चित्रकला निदेशक ही दोन पदे तासिका तत्वावर अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात भरावयाची आहेत. या पदांसाठी डीजीईटीच्या मानकानुसार पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लांजा यांच्याकडे कागदपत्रे व अनुभवाच्या दाखल्यासह 18 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत. 20 डिसेंबर रोजी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती होणार असून त्याच दिवशी निवड झालेल्या उमेदवाराला नियुक्ती पत्र देण्यात येईल, असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था लांजा यांनी कळविले आहे.*