
२०२३-२४ सालाची बुद्धीबळ शिष्यवृत्ती रत्नागिरीच्या सौरिश कशेळकर याला जाहीर
रत्नागिरी जिल्हा बुद्धीबळ विकास कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेली २०२३-२४ सालाची बुद्धीबळ शिष्यवृत्ती रत्नागिरीच्या सौरिश कशेळकर याला जाहीर करण्यात आली आहे. मूळचे चिपळूण येथील व सध्या ठाण्यात वास्तव्यास असलेले चार्टर्ड अकाऊंटंट आदित्य फडके यांनी त्यांच्या आजीच्या स्मृतीप्रित्यर्थ ही बुद्धीबळ शिष्यवृत्ती सुरू केली आहे. रोख पंचवीस हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे.
बुद्धीबळ खेळात व विशेष करून क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धांत उत्कृष्ट कामगिरी करणार्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुणवान बुद्धीबळपटूला प्रतिवर्षी ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. बुद्धीबळ स्कॉलरशिपचे हे पहिलेच वर्ष असून पुढील वर्षापासून स्कॉलरशीपच्या व्याप्तीत वाढ करण्यात येणार आहे. खेळाडूंना रत्नागिरी बाहेर जावून खुल्या स्पर्धा खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने इतर आर्थिक योजनाही प्रतीवर्षी राबविण्यात येणार आहेत. www.konkantoday.com