
चिपळूण येथे सुरू असलेले हायटेक बसस्थानकाचे काम ठेकेदार बदलला तरी मंदावलेले
चिपळूण येथे सुरू असलेले हायटेक बसस्थानकाचे काम गेल्या कित्येक वर्षापासून पूर्णत्वास गेलेले नाहीत. यासाठी नव्या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आल्यानंतरही या बांधकामास म्हणावी तशी गती मिळालेली नाही. विशेष म्हणजे विस्तारित असलेल्या बांधकामासाठी अवघे दोन तीन कामगार कार्यरत असल्याने यातून हायटेक बसस्थानकाचे काम कसे पूर्णत्वास जाणार, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
जुन्या मध्यवर्ती बसस्थानकाची इमारत तोडून त्या जागी हायटेक बसस्थानक उभारणीस प्रारंभ झाला. मात्र तत्कालीन ठेकेदार व एसटी महामंडळाच्या कुचकामी भूमिकेमुळे या बसस्थानक बांधकामाचा सुरूवातीपासून बट्ट्याबोळ उडाला. परिणामी काम सुरू होवून कित्येक वर्षे होवूनही त्याचा पायाही पूर्णत्वास केला नाही.
या बसस्थानकाचे काम पूर्णत्वास जावे यासाठी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आगार प्रशासनावर निवेदनाचा भडीमार केला होता. यातूनच महामंडळास जाग आल्यानंतर रखडलेले बसस्थानकाचे बांधकाम सुरू करण्यासाठी पूर्वीच्या ठेकेदाराचा ठेका काढून त्या जागी नव्या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली.
www.konkantoday.com