
म्हाप्रळ आंबेत पुल वाहतूकीसाठी खुला करावा या मागणीसाठी राजेश गमरे यांचे उपोषण
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे माजी तालुका अध्यक्ष राजेश गमरे हे म्हाप्रळ आंबेत पुल वाहतूकीसाठी खुला करावा या मागणीसाठी 16 सप्टेंबर 2023 रोजी उपोषणास बसले आहेत.संदर्भात मंडणगड तहसिल कार्यालयाकडे 4 सप्टेंबर 2023 रोजी निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनातील तीन मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून मिळाले होते मात्र सावित्री नदीवरील म्हाप्रळ-आंबेत खाडीपूल वाहतूकीसाठी तात्काळ सुरु करण्याते आश्वासनाची पुर्तता न झाल्याने, संबंधीत कामाची उच्चस्तरीय चौकशी आंबेत पुल वाहतुकीस खुला करण्याची मागणीसाठी ते उपोषणास बसले आहेत. याचबरोबर तालुक्यातील शासकीय कर्मचारी मुख्यालयाच्या ठिकाणी रहात नसल्याने त्यांची चौकशी करुन संबंधीतांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती, शहरातील पेट्रोल पंपावरील इंधन तुटवडा दुर करुन नागरीकांना नियमीतपणे इंधन पुरवठा व्हावा अशीही मागणी करण्यात आली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे
www.konkantoday.com