
कोकण विभागात पर्यटन विभागाकडून आतापर्यंत १६८ जणांना कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यास मान्यता
पर्यटन मंत्रालयाच्या कृषी पर्यटन धोरणांतर्गत कोकण विभागात पर्यटन विभागाकडून आतापर्यंत १६८ जणांना कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे.त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे पर्यटन व्यावसायासासह तरुणांना रोजगारही मिळणार आहे.
कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास साधणे, शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, कृषी पर्यटनाला कृषीपूरक व्यवसाय म्हणून प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागातील लोककला आणि परंपरा यांचे दर्शन घडविणे, ग्रामीण महिला व तरुणांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, शहरी भागातील लोकांना, विद्यार्थ्यांना शेती आणि शेती पद्धती तसेच कृषी संलग्न व्यवसायाची माहिती देणे, ग्रामीण भागातील राहणीमान उंचावणे, पर्यटकांना प्रदूषणमुक्त शांत व निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद देणे, प्रत्यक्ष शेतातील कामाचा अनुभव देणे, शेतावरील कृषी मालाच्या प्राथमिक प्रक्रियेस प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागातील पडीक गायरान आणि क्षार जमिनी उपयोगात आणणे या उद्देशावर कृषी धोरण अवलंबून आहे.
www.konkantoday.com