
लोकमान्य टिळक पुण्यतिथनिमित्त निबंध स्पर्धेत पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्यातर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पटवर्धन हायस्कूल रत्नागिरीच्या पाचवी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कुमारी समृद्धी शैलेश शिरगावकर इयत्ता आठवी अ प्रथम क्रमांक व कुमारी दूर्वा संतोष चव्हाण इयत्ता सहावी अ द्वितीय क्रमांक या विद्यार्थिनींना प्राप्त झाला. स्पर्धेत क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व शील्ड लोकमान्य मल्टीपर्पज बँकेच्या कार्यालयामध्ये दिले गेले तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती घाटविलकर मॅडम उप मुख्याध्यापक श्री पंगेरकर सर पर्यवेक्षक श्री लवंदे सर पर्यवेक्षिका श्रीमती शिरोळकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेसाठी श्रीमती हर्डीकर मॅडम श्री कनोजे सर व श्रीमती गांधी मॅडम या नियोजन समितीने काम पहिले.संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापकांनी गुणवंत मुलांचे कौतुक केले.




