
राज्यात 837 कोटी रुपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय
सायबर गुन्ह्यांविरुद्ध तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्यात 837 कोटी रुपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.मंत्रिमंडळ हा मोठा निर्णय झाला. या प्रकल्पामुळे नागरिकांना आता एका फोनवरून आठवडाभर 24 तास कार्यरत कॉल सेंटरवर तक्रार नोंदवता येणार आहे. अत्याधुनिक सायबर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तक्रारीचा तपास केला जाईल, यामुळे गुन्ह्याच्या मूळापर्यंत जाऊन गुन्हा उघड करणं आणि गुन्हा सिद्ध करून शिक्षेचं प्रमाण वाढविण्यास मदत होणार आहे.
www.konkantoday.com




