
चिपळूण शहरातील डोंगर भागात नियम डावलून बांधकाम करणाऱ्या व्यवसायिकांना नोटीसा काढा -उबाठाची मागणी
चिपळूण शहरात काही बांधकाम व्यावसायिकानी
स्वतःच्या फायदयासाठी सर्व नियम पायदळी तुडवून शहरातील काही भागांमध्ये डोंगराची कटाई करून इमारती बांधल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अशा व्यावसायिकांना तातडीने नोटीस काढून त्यांच्याकडून सरंक्षण भिंती बांधून घ्याव्यात तसेच चिपळूण शहरातील उखडलेल्या रस्त्याची दुरुस्ती गणेश उत्सवापूर्वी करावी, अशी मागणी शिवसेना उबाठा गटाने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे
निवेदनाद्वारे केली केली आहे निवेदनात असे म्हटले की शहरात कंत्राटदारानी बांधलेल्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे यातील बहुतांशी रस्ते हमी कालावधीत आहेत त्यामुळे संबंधित ठेकेदारांकडून गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची डागडुजी करून घ्यावी तसेच इतर प्रलंबित कामे मार्गी लावावेत अशी मागणी करण्यात आली आहे तसेच डोंगर भागात बांधलेल्या इमारतीमुळे इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे त्यामुळे बांधकाम व्यवसायिकांकडून किंवा नगर परिषदेने इमारतीच्या बाजूला संरक्षण भिंती बांधाव्यात अशी ही मागणी करण्यात आली आहे
www.konkantoday.com