
कोकण रेल्वे मार्गावर विसापूर-मडगाव धावणार १२ जानेवारीपर्यंत
कोकण रेल्वे मार्गावर आग्नेय मध्य रेल्वेच्या समन्वयाने २० डिसेंबरपासून चालवण्यात येत असलेली बिलासपूर-मडगांव साप्ताहिक स्पेशल १२ जानेवारीपर्यंत धावणार असल्याने पर्यटक सुखावले आहेत.
०८२४१/०८२४२ क्रमांकाची विसापूर-मडगांव एक्सप्रेस स्पेशल बिलासपूरहून दर शनिवारी म्हणजेच २ आणि ×१० जानेवारी रोजी दुपारी २.४५ वाजता सुटेल. तिसर्या दिवशी मध्यरात्री २.१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ५ आणि १२ जानेवारी रोजी दर सोमवारी पहाटे ५.३० वाजता सुटून दुसर्या दिवशी सायंकाळी ४ वाजता बिलासपूरला पोहोचेल.
या साप्ताहिक स्पेशलला भाटमारा, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमान, नाशिक, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम, करमाळी आदी स्थानकात थांबे आहेत.
www.konkantoday.com




