
रत्नागिरी जिल्ह्यातील 4441 शेतकर्यांच्या खात्यात 8.93 कोटी जमा
रत्नागिरी : शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणार्या रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या यादीतील एकूण 6569 शेतकर्यांपैकी 5830 शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वी झाले आहे. एकूण 4441 शेतकर्यांच्या बचत खात्यामध्ये रूपये 8.93 कोटींचा लाभ जमा झाला आहे.
जिल्ह्यातील बँक ऑफ बडोदा मधून 13, बँक ऑफ इंडियामधून 1300, बँक ऑफ महाराष्ट्रमधून 453, कॅनरा बँकेमधून 3, सेंट्रल बँक ऑफ इंडियामधून 67, आय. सी. आय.सी. आय. बँकेतून 2, आय. डी. बी. आय. बँकेतून 3, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून 4039, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून 12, स्टेट बँक ऑफ इंडिया मधून 34, युनियन बँक ऑफ इंडिया मधून 30, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमधून 613 अशा एकूण 6569 शेतकर्यांनी पीक कर्ज घेतले होते. त्यापैकी 4441 शेतकर्यांच्या बचत खात्यात 8,93,29,220 रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे.
2016-17, 2017-18 आणि 2018-19 या पैकी कोणत्याही दोन वर्षात अल्प मुदत पीक कर्ज घेऊन मुदतीत परतफेड केलेले शेतकरी प्रत्यक्ष कर्ज मुद्दल किंवा रूपये 50 हजार यापैकी जे कमी असेल तेवढी प्रोत्साहन रक्कम मिळण्यास ते शेतकरी पात्र आहेत.