
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील चोरीला गेलेल्या ऐवजाची रक्कम ८ लाखांवर.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील स्वामी गजानन इमारतीत झालेल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकासह पोलिसांकडून तपास सुरूच आहे. अजूनही ठोस धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. घरफोडीत चोरीस गेलेल्या दागिन्यांच्या रकमेचा आकडा ८ लाखांवर पोहोचला आहे.या घरफोडी प्रकरणी लवकरच चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात यश येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. www.konkantoday.com