
कोकणच्या पर्यटनासाठी राज्य सरकारने विशेष प्रयत्न करावेत : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
चिपळूण : कोकणच्या पर्यटनासाठी राज्य सरकारने विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. कोकण पर्यटनात मागासलेले आहे. याचे कारण म्हणजे प्रयत्न अपुरे पडेत आहेत. आपणही त्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, येथून आवश्यक असलेले प्रस्तावच येत नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी
केले. कोंढे (ता. चिपळूण) रिगल एज्युकेशन संस्थेच्यावतीने पहिल्या ‘रिगल कोकणरत्न’ सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ना. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी विमुक्त घुमंत तथा अर्ध घुमंत वनजाती विकास व कल्याण मंडळाचे अध्यक्ष दादा इदाते, आ. शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष संजय शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के, मामा महाजन प्रतिष्ठानचे दीपक महाजन, गंगाराम इदाते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ना. नाईक यांच्या हस्ते निसर्ग क्षेत्रात काम करणारे सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे, बेवारस स्त्री-पुरुषांना हक्काचे घर मिळवून देणार्या माहेर संस्थेच्या प्रतिनिधी मीरा गायकवाड व शितल हिवराळे, ऑर्गनवर संशोधन करणारे नवेदर आडिवरे येथील बाळ दाते, ज्येष्ठ कबड्डीपटू सुनील मोकल यांना पहिल्या रिगल कोकणरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.