सांगली जिल्ह्यातील मल्टीलेवल मार्केटींग कंपनीचा कोकणवसियांना तब्बल ८० कोटींचा चुना?

सहा महिन्यात दामदुप्पट आण एजंटना तब्बल २० टक्के कमिशन असे आमिष दाखवत सांगली येथील एका ग्लोबल मल्टीलेवल मार्केटींग कंपनीने दापोलीकरांना ८० कोटी रुपयांचा चुना लावला आहे. परदेशात फरार झाल्यानंतर कंपनीच्या मालकांनी एका ऑडिओ क्लीपद्वारे आपण आता शून्य झालो असून यापुढे कंपनीच्या नावावर कोणीही पैसे गोळा करू नयेत असे स्पष्ट केले आहे.
सांगली शहरातील ग्लोबल काम करणार्‍या एका मल्टीलेवल मार्केटींग कंपनीचा ६ महिन्यापूर्वी उदय झाला. फोरेक्स मार्केटमध्ये आम्ही ट्रेडिंग करतो असे सांगत या कंपनीच्या एजंटांनी दापोलीपर्यंत आपले जाळे विस्तारले. दापोली, मंडणगड तालुक्यातील लाटवण परिसरातील एका पोस्ट खात्यात काम करणार्‍या एजंटला हाताशी धरून दापोलीतील गुंतणवणूकदारांकडून गेल्या ६ महिन्यापासून पैसे गोळा करायला सुरूवात केली. सुरूवातीला ५०० डॉलर म्हणजेच ३८ हजार पाचशे रुपयांची गुंतवणूक केल्यावर दरमहा ६ ते ९ टक्के इतका परतावा देण्यात येणार असल्याचे सांगत ७७ हजार पासून ७७ लाख रुपयांपर्यंतचे आकर्षक पॅकेज तयार केले होते. ७७ लाखांची गुंतवणूक करणार्‍या गुंतवणुकदाराला दरमहा १८ ते २० टक्के इतका भरघोस परतावा देण्याचे कंपनीने एजंटमार्फत सांगितले होते.
दापोली, मंडणगड, खेड, चिपळूण, कोल्हापूर या परिसरातून दापोलीमधील एजंटांमार्फत तब्बल ८० कोटी रुपयांची गुंतवणूक ग्लोबल कंपनीत झाली आहे. अल्पावधीतच दामदुप्पट आणि आकर्षक भरघोस कमिशन यामुळे अनेक एजंटांनी आपली तुंबडी भरत नेहमीप्रमाणे यावेळीही गुंतवणुकदारांना वार्‍यावर सोडले आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button