
शाळा सुरू करण्यासाठी हीच वेळ योग्य शिक्षण तज्ज्ञांचे मत maharashtra school reopening
राज्यातील शाळा सरसकट सुरू होण्याच्या वाटेवर असताना राज्य सरकारने त्या पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली असून उलट शाळा सुरू करण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याचे मत राष्ट्रीय पातळीवर व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळायचे असल्यास पहिलीपासून सर्वच शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात याव्यात अशी मागणी शिक्षणतज्ज्ञांकडून केली जात आहे. राज्यात आठवीपासूनचे वर्ग २७ जुलैपासून सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती हळूहळू वाढू लगल्याचे दिसत होते. राज्यातील १० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी नियमित शाळेत जात आहेत.
www.konkantoday.com