हाफकीन संस्थेला लस उत्पादन करण्याची परवानगी देण्याची राज्याची मागणी केंद्र सरकारने मान्य केली

करोनाविरुद्ध सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या लढ्याला बळ देणारी घटना घडली आहे. महाराष्ट्रातील लसींच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी आणि लसीकरणाला वेग देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हाफकीन संस्थेला लस उत्पादन करण्याची परवानगी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. केंद्राने मागणी परवानगी दिली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button